संघप्रार्थना
वृत्तः
भुजंगप्रयात
मूळ संस्कृत संहिताः नरहरी नारायण भिडे, फेब्रुवारी १९३९
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१९१००१
|
॥ |
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे |
नमू मायभूमी तुला प्रीय माते |
|
॥ |
प्रभो शक्तिमन्
हिन्दुराष्ट्रांगभूता |
प्रभो शक्तिशाली, मुले हिन्दुभूची |
|
॥ |
अजय्यां च विश्वस्य देहीश
शक्तिम् |
न हारू जगाला अशी शक्ति दे तू |
|
॥ |
समुत्कर्ष
निःश्रेयसस्यैकमुग्रम् |
समुत्कर्ष होवो, नको श्रेय त्याचे |
|
॥ |
विजेत्री च नः संहता
कार्यशक्तिर् |
विजेती असो संहता कार्यशक्ती |
॥ भारत माता की जय ॥
https://www.youtube.com/watch?v=Sm8YBEe32WA
http://anuvad-ranjan.blogspot.com/2019/10/blog-post.html#links
अर्थ:
हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
॥ भारत माता की जय ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा