२०२३०७०७

एकात्मता स्तोत्र

ॐ सच्चिदानन्दरूपाय नमोऽस्तु परमात्मने ।
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमाङ्गल्यमूर्तये ॥ १ 

प्रकृतिः पञ्चभूतानि ग्रहा लोकाः स्वरास्तथा ।
दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मङ्गलम् ॥ २  

रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥  

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा ॥ ४  

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ॥ ५  

अयोध्या मथुरा माया काशीकाञ्ची अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ॥ ६  

प्रयागः पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इन्द्रप्रस्थं सोमनाथः तथाSमृतसरः प्रियम् ॥ ७ 

चतुर्वेदाः पुराणानि सर्वोपनिषदस्तथा ।
रामायणं भारतं च गीता सद्दर्शनानि च ॥ ८ ॥ 

जैनागमास्त्रिपिटकाः गुरुग्रन्थः सतां गिरः ।
एषः ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदि सर्वदा ॥ ९ ॥ 

अरुन्धत्यनसूया च सावित्री जानकी सती ।
द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावती तथा ॥ १० ॥ 

लक्ष्मीरहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रमा ।
निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवताः ॥ ११ ॥ 

श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः ।
मार्कण्डेयो हरिश्चन्द्र: प्रह्लादो नारदो ध्रुवः ॥ १२ ॥ 

हनुमान्‌ जनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः ।
दधीचिविश्वकर्माणौ पृथुवाल्मीकिभार्गवाः ॥ १३ ॥

भगीरथश्चैकलव्यो मनुर्धन्वन्तरिस्तथा ।
शिविश्च रन्तिदेवश्च पुराणोद्गीतकीर्तय: ॥ १४ ॥ 

बुद्धा जिनेन्द्रा गोरक्षः पाणिनिश्च पतञ्जलिः ।
शङ्करो मध्वनिंबार्कौ श्रीरामानुजवल्लभौ ॥ १५ ॥ 

झूलेलालोSथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा ।
नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥ १६ ॥ 

देवलो रविदासश्च कबीरो गुरुनानकः ।
नरसिस्तुलसीदासो दशमेशो दृढव्रतः ॥ १७ ॥ 

श्रीमत् शङ्करदेवश्च बन्धू सायणमाधवौ ।
ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरन्दरः ॥ १८ ॥ 

बिरसा सहजानन्दो रामानन्दस्तथा महान्‌ ।
वितरन्तु सदैवैते दैवीं सद्गुणसंपदम्‌ ॥ १९ ॥ 

भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा ।
सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥ २० ॥ 

रविवर्मा भातखण्डे भाग्यचन्द्रः स भूपतिः ।
कलावंतश्च विख्याताः स्मरणीया निरन्तरम्‌ ॥ २१ ॥ 

अगस्त्यः कंबुकौण्डिन्यौ राजेन्द्रश्चोलवंशजः ।
अशोकः पुश्यमित्रश्च खारवेलः सुनीतिमान्‌ ॥ २२ ॥ 

चाणक्यचन्द्रगुप्तौ च विक्रमः शालिवाहनः ।
समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेन्द्रो बप्परावलः ॥ २३ ॥ 

लाचिद्भास्करवर्मा च यशोधर्मा च हूणजित्‌ ।
श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥ २४ ॥

मुसुनूरिनायकौ तौ प्रतापः शिवभूपतिः ।
रणजितसिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमाः ॥ २५ ॥

वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा ।
चरको भास्कराचार्यो वराहमिहिरः सुधीः ॥ २६ ॥ 

नागार्जुनो भरद्वाजः आर्यभट्टो वसुर्बुधः ।
ध्येयो वेंकटरामश्च विज्ञा रामानुजादयः ॥ २७ ॥ 

रामकृष्णो दयानन्दो रवीन्द्रो राममोहनः ।
रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानन्द उद्यशाः ॥ २८ ॥ 

दादाभाई गोपबन्धुः तिलको गान्धिरादृताः ।
रमणो मालवीयश्च श्रीसुब्रह्मण्यभारती ॥ २९ ॥ 

सुभाषः प्रणवानन्दः क्रान्तिवीरो विनायकः ।
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥ 

संघशक्तिप्रणेतारौ केशवो माधवस्तथा ।
स्मरणीयाः सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥ ३१ ॥ 

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तहृदयाः
अनिर्दष्टा वीराः अधिसमरमुद्ध्वस्तरिपवः ।
समाजोद्धर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणाः
नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम्‌ ॥ ३२ ॥ 

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत्‌ ।
स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत्‌ ॥ ३३ ॥ 

॥ भारत माता की जय 

२०२३०५१९

॥ सार्थ एकात्मता स्तोत्र ॥

 ॥ एकात्मता स्तोत्र ॥ 


परंपरागत प्रातस्मरण रोज सकाळी उठून म्हटल्याने आपल्याला आपल्या वारशाची, संस्कृतीची आणि कर्तव्यांची जाणीव दिवसाच्या सुरूवातीलाच होऊन आपण कर्तव्यपूर्तीकरता दैनंदिनीचे नियोजन करू शकतो. याकरता भारतीय परंपरेत पहाटेसच उठून प्रातःस्मरण म्हणण्याची प्रथा होती. आज ती नामशेष झालेली आहे. मीही पूर्वी (लहान असतांना) प्रातस्मरण म्हणत असे. 

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती । करमूलेः तु गोविंदः प्रभाते करदर्शनं ॥ 

म्हणजे, बोटांवर नांदते लक्ष्मी, तळहाती सरस्वती । मनगटी नांदतो ईश, (हाताचे) पहाटे कर दर्शन ॥ 

या श्लोकाने सुरूवात होणारे अठरा वीस श्लोकांचे ते पूर्ण प्रातस्मरण होते. आज ते आठवणारे आणि म्हणणारेही मोजकेच असतील. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परंपरागत प्रातस्मरणात अर्वाचीन भारतातील संस्मरणीय आभूषणांची भर घालून केलेले प्रातस्मरण संघाच्या प्रभातशाखांवर आजही म्हटले जाते. त्याकाळी त्या प्रातस्मरणास, संघात भारतभक्तीस्तोत्र म्हणत असत. हल्ली एकात्मता स्तोत्र म्हणतात. हे नावच आजच्या त्याच्या स्वरूपास जास्त शोभून दिसते. मी संघाचा प्रचारक नाही. मात्र प्रातस्मरणाची आवश्यकता जाणवलेला भारतमातेचा पुत्र आहे. पूर्वी जेव्हा मी संघाच्या प्रातस्मरणातील आभूषणांच्या वैशिष्ट्यांचा शोध घेतला होता तेव्हाच, त्याचा अर्थ माझ्यापुरता पुनर्संकलित केला होता. ते प्रातस्मरण आणि त्याचे ते अर्थशोधन इथे देत आहे. ज्यांचा याच्याशी कधीच संबंध आलेला नव्हता त्यांनी हे पूर्वग्रहविरहित दृष्टीने वाचून त्याची उपयुक्तता ठरवावी. जे त्याचेशी पूर्वपरिचय राखतात त्यांना कदाचित हे अर्थशोधन नवे वाटू शकेल. 

निसर्गतःच आपल्याला निरागसतेची आवड असते. जे प्रकृतीनी सुंदर असेल, प्रचितीनी विलोभनीय असेल त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली जाते. ते हवेहवेसे वाटते. एखाद्या मोहक देखण्या हावभावाचा आपल्यावर एवढा प्रभाव पडतो की आपल्याही नकळत आपण त्याचे अनुकरण करू पाहतो. चांगल्याचे अनुकरण करण्याची ओढ मनुष्याला जीवनहेतूच्या निकट नेत असते. मग निर्माण होते कुतुहल. की खरंच, जीवनाचा हेतू काय असावा? आपल्याला सुष्ट आणि दुष्ट आविष्कार ओळखता का येतात? सुष्ट आविष्कारच का आवडतात? अनादी कालापासून मनुष्याला हे कोडे कुतुहलाचे ठरलेले आहे. पूर्वसुरींनी आपापल्या परीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. परिसरातील चराचरांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि सृजनाचे गूढ उलगडता उलगडता संस्कृती उदयास आली. मानवी मन मुळातच संवेदनाशील असते. सुष्टप्रिय असते. सत्यशोधक असते. समाजशील असते. ते तसेच का असते? हा प्रश्न मनुष्याला प्रवृत्त करतो. स्फुरण देतो. चेतवतो. अशाचप्रकारे उत्स्फूर्त होऊन पूर्वसुरींनी ज्या संस्कृतीला जोपासले, तिची उपासना व संस्मरण आपलाही मार्ग खचितच प्रशस्त करू शकेल. ज्या चराचरांनी त्यांना घडवले त्यांचे स्मरण आपल्यालाही प्रेरक ठरू शकेल. या विश्वासातूनच प्रातःस्मरणाचा जन्म झाला.

भारतभक्तीस्तोत्राची रचना झाली. मनुष्यस्वभाव समाजशील असल्यामुळे आणि भाषा हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असल्यामुळे, स्वतःस झालेले परिस्थितीचे दर्शन/आकलन निकटवर्तियांस अनुभूत करून देण्यात त्याला आनंद वाटतो. त्यामुळे स्वभावतःच भाषा ही वर्णनाचे साधन ठरते. एक असते गुणवर्णन आणि दुसरे असते दोषदर्शन. अन् निंदा ही अनिष्टकारक असल्याचे सर्वमान्यच असल्याने, चांगुलपणाची स्तुती हा अभिव्यक्तीचा सुसंस्कृतपणा समजला जाऊ लागला. मग जन्माला आली ती स्तोत्रे. देवदेवतांची स्तवने. राजेरजवाड्यांची प्रशंसागीते. सृष्टीसौंदर्याची वर्णने आणि अशाच असंख्य रचना. निंदानिर्मित अनिष्टांपासून मानवतेचे रक्षण करणारी अभिव्यक्ती हीच या सर्व स्तोत्रांची प्रेरणा असल्याचे दिसून येते. त्यातून हे स्तोत्र तर जीवनहेतूच्या एवढे जवळ नेणारे आहे. आपले आयुष्य जर उन्नत करायचे असेल तर आपण हे स्तोत्र मुखोद्गत केलेच पाहीजे. एवढेच नव्हे तर समजून उमजून त्याचे मननही केले पाहीजे. जमीन कसदार असेल तर पीक मोत्यांचे येते. त्यातून, ज्या भरतभूमीला नररत्नांची खाण म्हणून गौरवले जाते, त्या भूमीचा कस तो काय वर्णावा. त्या वतनभूचे, तिच्यात अंगभूत असलेल्या पंचमहाभूतांचे, तिच्या पर्वतनद्यादी आभूषणांचे आणि एकूणच साऱ्या पार्श्वभूमीचे स्तवन सुरूवातीच्या काही श्लोकांतून केलेले आहे. 

जी भरतभू सुजल श्यामल आणि शस्य, शोभे समुद्रवलयांकित जी प्रशस्त । 
आभूषणे स्मर तिची तव मानसात, तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

ही आपली मातृभूमी आहे. ते दगड. ती माती. ती हवा. ते पाणी. या साऱ्यांचे बनलेले खण्डहर म्हणजे ती नव्हे. ती आहे विश्वमांगल्याची चिरंतन ज्योत. सर्व पंचमहाभूतांची अभेद्य संघटना. संघ. त्या आनंदमयी मातेस प्रथमतः वंदन! 

ओम् नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने । ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ॥ १ ॥ 

सर्व ग्रहनक्षत्रे, ही सृष्टी, हा परिसर आकाशपाताळादी सर्व लोक व त्यांना बंधनात ठेवणाऱ्या दशदिशा आणि काळ हे आम्हा सर्वांचे नेहमी कल्याण करोत. 

प्रकृतिः पंचभूतानी ग्रहलोका स्वरास्तथा । दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वंतू मंगलम् ॥ २ ॥ 

समुद्रवसना भारतमातेला देवतात्मा हिमालय मुकुटाप्रमाणे शोभून दिसतो. ऋषी, महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी आदी महापुरूषांच्या अशा या महन्मातेला आमचे प्रणाम असोत. 

रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटीनीम् । ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम् ॥ ३ ॥ 

उत्कलप्रदेशाचे भूषण असलेला आणि महर्षी परशुरामाचे कायमचे निवासस्थान असणारा महेंद्र पर्वत, दक्षिण भारताचे भूषण ठरणारा निलगिरी (मलयगिरी) पर्वत, स्वातंत्र्याची मंगल लेणी ठरलेले कोटकिल्ले अंगाखांद्यावर बाळगणारा सह्याद्री पर्वत, देवदेवतांची तीर्थक्षेत्रे असल्यामुळे गौरव पावलेला हिमालय पर्वत, वनराज सिंहांचे वसतीस्थान असणारा रैवतक (गिरनार) पर्वत, वयोवृद्ध गिरीराज विंध्याचल तथा महाराणा प्रतापांची आठवण देणारा अरवली पर्वत हे सर्व संस्मरणीय आहेत. 

महेंद्रो मलय सह्यो देवतात्मा हिमालयः । ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारवलिस्तथा ॥ ४ ॥ 

लोकमाता गंगा, विद्यादेवी सरस्वती, आर्यसंस्कृतीची आद्य पोषणकर्ती सिंधू, ईशान्य भारताची जीवनसरिता ब्रह्मपुत्रा, गंगेची पुष्टीवर्धिनी गण्डकी, दण्डकारण्यातील अक्षयसरिता कावेरी, कृष्णकन्हय्याची यमुनामय्या, स्फटिकप्रस्तरांतून झेपावणारी रेवा (नर्मदा), कृष्णप्रस्तरांत शोभून दिसणारी कृष्णा, दक्षिणगंगा गोदावरी तसेच विंध्यकुमारी महानदी ह्या नद्या आपले जीवन सरस करतात. समृद्ध करतात. म्हणूनच त्यांचेही स्मरण आपणांस प्रेरक आहे. 

गंगा सरस्वती सिंधुब्रह्मपुत्रश्च गण्डकी । कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ॥ ५ ॥ 

वसली अनेक नगरे वसले प्रदेश । स्फुरली अनेक शास्त्रे स्फुरलेही धर्म ॥ 
त्यांचा समग्र महिमा धर मानसात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

संस्कृतीचा उदय आणि उत्कर्ष जिथे झाला, ती तीर्थक्षेत्रे संस्मरणीय आहेत. सुसंस्कृत आचरणाचे नियम म्हणजेच धर्मशास्त्रे. त्यांचा विकास कसा झाला, त्यांची निर्मिती कशी झाली ह्याची आठवण प्रेरणादायी ठरते. एवढेच काय पण त्यांचे नामस्मरणही मनाला उभारी आणते. रामजन्मभूमी अयोध्या, कृष्णजन्मभूमी मथुरा, पहाडी प्रदेशातून सखल प्रदेशात गंगावतरण होते ते हरिद्वार (मायापुरी), देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान काशी, परंपरागत विद्यानगरी कांची, सम्राट विक्रमादित्याची राजधानी उज्जैन (अवंतिका), जगन्नाथाची रथयात्रा आजही चालवणारी जगन्नाथपुरी (नीलांचल), पाणिनी अन् कौटिल्यल्यकालीन विश्वविद्यालय तक्षशीला, तसेच भगवान बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती गया यांचे स्मरण आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देते. 

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका । वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ॥ ६ ॥ 

गंगा यमुनेच्या पवित्र संगमाचे स्थान प्रयाग, सम्राट चंद्रगुप्ताची राजधानी पाटलीपुत्र, कृष्णदेवरायाची राजधानी विजयानगर, पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ, गौरवशाली इतिहासाचे सोमनाथ आणि अमृतसरोवरवेष्ठित हरमिंदरसाहेबांचे पवित्र मंदिर असलेले अमृतसर यांचे स्मरण आपल्याला आपल्या प्रेरणांचे दर्शन घडवते. चारही वेद, अठरा पुराणे, सर्व उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता आणि सद्दर्शने; तसेच जैनागम, त्रिपिटक, गुरूग्रंथसाहेब आणि सज्जनांची वचने ही आमची श्रद्धास्थाने आहेत. म्हणूनच संस्मरणीयही आहेत. 

चतुर्वेदाः पुराणानी सर्वोपनिषदस्तथा । रामायणं भारतंच गीता सद्दर्शनानी च ॥ ८ ॥ 

जैनागमास्त्रिपिटका गुरूग्रंथः सतां गिरः । एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदी सर्वदा ॥ ९ ॥ 

पतिव्रतांचा आदर्श ठरल्यामुळे सप्तर्षींसोबत आकाशात चमचमणारी अरुंधती, दत्तात्रेयांनी जिच्यापोटी जन्म घेतला ती महासती अनुसया, प्रत्यक्ष यमाकडूनही पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, पत्नीत्वाचा आदर्श ठरलेली भूमीकन्या जानकी, पतीचा अनादर सहन न झाल्याने पित्याकडील यज्ञात भस्म होणे पत्करणारी दक्ष प्रजापतीची कन्या सती (पार्वती), अलौकिक पतीव्रता द्रौपदी, पतीवरील अन्याय त्याच्या मृत्यूनंतरही राजसभेत वाद करून दूर करणारी सती कण्णगी, जनकसभेत पती याज्ञवल्क्य याजसोबत शास्त्रार्थात भाग घेणारी ब्रह्मवादिनी गार्गी तसेच कृष्णभक्त संत मीराबाई या स्त्रिया आपल्या संस्कृतीतील स्त्रीत्वाच्या आदर्श आहेत.

अरुंधत्यनसूया च सावित्री जानकी सती । द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावतीस्तथा ॥ १० ॥ 

परंतु गढामंडलाच्या राणी दुर्गावतीसारख्या स्त्रिया पराक्रमांचे निकष घडवतात. अशा स्त्रियांच्या शूरतेनेही आमचा इतिहास संपन्न आहे. 

विद्युल्लता जशी चमकते घन अंबरात । लढल्या स्त्रियाही पूर्वी भर संगरात ॥ 
त्यांच्याविना अधुरा, संसार स्मर मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

महाराणी लक्ष्मीबाई, प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच काकतीय सम्राज्ञी रुद्रमांबा यांच्या कथा आजही आम्हाला स्फुरण देतात. यांच्याचप्रमाणे समाजहितैषी भगिनी निवेदिता व रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी शारदादेवी याही आम्हाला पूजनीय आहेत. 

लक्ष्मीरहल्याचन्नम्मा रुद्रमांबा सुविक्रमा । निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवता ॥ ११ ॥ 

मर्यदापुरूषोत्तम राम, ज्याच्या नावाने आपला देश "भारत" म्हणून ओळखला जातो तो भरत, योगेश्वर कृष्ण, प्रतिज्ञेचा गौरव ज्यांनी आपल्या आचरणाने वाढवला ते पितामह भीष्म, सर्वश्रेष्ठ धर्मपरायण युधिष्ठिर, महान धनुर्धर अर्जुन, बालपणातच अपमृत्यूशी यशस्वी झुंज देणारे महर्षी मार्कंडेय, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, परमभक्त प्रल्हाद, धर्मोल्लंघनावर मनोवैज्ञानिक उपचार करणारे महर्षी नारद तसेच घोर तपश्चर्या करून अढळपद प्राप्त करून घेणारा बाल ध्रुव हे आमचे वर्तणुकीचे आदर्श आहेत. 

श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः । मार्कंडेयो हरिश्चंद्रः प्रल्हादो नारदो ध्रुवः ॥ १२ ॥ 

स्वामीनिष्ठेचे चिरंतन प्रतीक रामभक्त हनुमान, आत्मज्ञानी मिथिलानरेश जनक महाराज, "व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वं" असे ज्यांच्याबाबत म्हटले जाते ते महर्षी व्यास, प्रत्यक्ष श्रीरामाला "योगवासिष्ठ्या"चा उपदेश करणारे गुरूवर्य वसिष्ठ, राजा परीक्षिताला मृत्यूपूर्व सात दिवसांत भागवत कथा कथन करणारे व्यासांचे पुत्र दैत्यगुरू शुक्राचार्य, बळाच्या जोरावर देवलोकावर अधिराज्य करणारा प्रल्हादाचा नातू बळीराजा, उन्मत्त वृत्रासुराच्या निर्दालनासाठी वज्र तयार करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या अस्थी दिल्या ते दधीची ऋषी, "सुदर्शन चक्र, त्रिशूळ व वज्र" इत्यादी अमोघ शस्त्रांचा निर्माता आद्य स्थपती विश्वकर्मा. ज्याच्या कृषीविकासाच्या धोरणांमुळे ही धरणी एवढी संपन्न झाली की तिला पृथ्वी हे नाव प्राप्त झाले तो पृथू राजा, रामायणकार महर्षी वाल्मिकी तसेच चिरंजीव धनुर्धर परशुराम अशा अनेकानेक महापुरूषांच्या चरीत्रांचा समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे. 

हनुमानंजनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः । दधीचिर्विश्वकर्माणौ पृथुर्वाल्मीकिभार्गवाः ॥ १३ ॥ 

आपल्या अविरत प्रयत्नांनी ज्याने अवनीतलावर गंगावतरण केले व "प्रयत्नांना" भगीरथ हे विशेषण प्राप्त करून दिले तो राजा भगीरथ, गुरूदक्षिणेच्या स्वरूपात ज्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठाही सहज कापून दिला तो परमशिष्य एकलव्य, आदीपुरूष मनू, चौदा रत्नांतील एक रत्न आणि आयुर्वेदाचे जनक आचार्य धन्वंतरी, शरणागत कबुतरास जीवन देण्यासाठी ससाण्यास स्वतःचे शरीर अर्पण करणारा शिबीराजा तसेच दुष्काळात जनतेला सर्वस्व वाटून टाकणारा राजा रंतिदेव यांची कीर्ती पुराणांमध्ये सांगितलेली आहे. हे सर्व आमचे स्फुर्तीस्त्रोत आहेत. 

भगीरथश्चैकलव्योमनुर्धन्वंतरिस्ततथा । शिबिश्च रंतिदेवश्च पुराणोद्गीतकीर्तयः ॥ १४ ॥ 

अज्ञानामुळे भासमान असणाऱ्या जरामरणादी दुःखांवर विचारपूर्वक विजय मिळवण्याची व अहिंसामर्गाने संयमित जगण्याची बुद्धी ज्याराजपुत्र सिद्धार्थाने तपचरणाने मिळवली तो भगवान बुद्ध, जैन विचारधारेचा जनक महावीर, महान् हठयोगी गोरक्षनाथ, "अष्टाध्यायी"सारख्या व्याकरणशास्त्राचा रचयिता पाणिनी, प्रसिद्ध योगसूत्रकार पतंजली, अद्वैतमताचे आद्य पुरस्कर्ते शंकराचार्य, द्वैतवादाचे प्रवक्ते वैष्णव मध्वाचार्य, द्वैत व अद्वैत वादांची सांगड घालणारे निंबार्काचार्य, विशिष्ताद्वैतमताचे प्रतिपादक रामानुजाचार्य तसेच शुद्धाद्वैतमताचे जनक वल्लभचार्य या साऱ्यांनी आम्हाला सद्धर्माची शिकवण दिली. 

बुद्धो जिनेंद्रो गोरक्षः पाणिनिश्च पतंजली । शंकरो मध्वनिंबार्कौ श्रीरामानुजवल्लभौ ॥ १५ ॥ 

इसवी सनाच्या १० व्या शतकात जबरीच्या सार्वत्रिक धर्मांतराचे प्रयत्न विफल करणारे झुलेलाल, महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू, तिरुक्कुरलाचे रचयिता तिरुवल्लुवर, शैव आणि वैष्णव संत, कंबरामायणकार रामभक्त कंब तसेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक बसवेश्वर यांनी आमच्या धर्मभावना सन्मार्गी लावल्या.

झुलेलालोऽथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा । नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥ १६ ॥ 

धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात प्रवेशाचा मार्ग सुकर करणारे देवलस्मृतीचे रचनाकार देवल, थोर संत रोहिदास, महान् स्पष्टवक्ता संत कबीर, शिख पंथाचे संस्थापक गुरू नानक, "वैष्णव जन तो तेणे कहिये" या सुप्रसिद्ध भजनाचे रचयिता नरसी मेहता, "रामचरितमानसकार" संत तुलसीदास तसेच शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी आमची सद् अभिरुची तेवत ठेवली. 

देवलो रविदासश्च कबीरो गुरूनानकः । नरसिस्तुलसीदासो दशमेशो दृढव्रतः ॥ १७ ॥ 

आसामात भागवत धर्माचा प्रसार करणारे शंकरदेव यांनी भागवत धर्माचे सार सांगणारा "गुणमाला" ग्रंथ लिहीला. मध्वाचार्य तथा सायणाचार्य यांनी विजयानगरचे साम्राज्य वैभवास नेले. भागवत धर्म महाराष्ट्रात वाढला याचे श्रेय ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांचे आहे. त्याबाबत असे म्हणतात की "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस". शिखांचे चौथे गुरू रामदास तर सर्वश्रुतच आहेत. मात्र "तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई" हा आगळा संदेश आपल्या रामदासस्वामींनी दिलेला आहे. पुरंदरदासांचे वर्णन तर "कर्नाटकाचे तुकाराम" असेच करतात. या सर्वांची शिकवण आम्हाला संयमित सहजीवनाला सामर्थ्याची जोड देण्यास सांगते. 

श्रीमत् शंकरदेवश्च बंधू सायणमाधवौ । ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरंदरः ॥ १८ ॥ 

बिरसा मुंडा यांनी दक्षिण बिहार, ओरिसा तसेच मध्यप्रदेशातील विजनवासी जनतेला संघटित करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. स्वामी सहजानंदांनी उद्धव संप्रदायाची स्थापना केली. रामानंदांनी लोकाभिमुख धर्माचा प्रचार केला. कबीर, रोहीदास, सेना न्हावी, पद्मावती आदी त्यांचेच शिष्य होत. या सर्व महात्म्यांनी त्यांच्या दैवी गुणसंपदेचा वारसा आम्हाला दिलेला आहे. 

बिरसा सहजानंदो रामानंदस्तथा महान् । वितरंतू सदैवैते दैवीं सद्गुणसंपदम् ॥ १९ ॥ 

नाट्यशास्त्राचे आद्याचार्य भरतमुनी, "अभिज्ञान शाकुंतलम्, मेघदूत, रघुवंश" इत्यादी महाकाव्यांचा रचयिता महाकवी कालीदास, बहुविद्याविशारद राजा भोज, होयसाळ शैलीचा प्रख्यात शिल्पशास्त्री जकणाचार्य ज्याने "हळेबिडू, बेलूर, सोमनाथ" इत्यादी मंदिरांचे शिल्प घडवले, "सूरसागर" रचयिता सूरदास, "धनराज पंचरत्न" कर्ता त्यागराज तसेच "सवैय्यां"चा कर्ता रसखान यांनी आमचा इतिहास कलासमृद्ध केलेला आहे. 

भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा । सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥ २० ॥ 

महान चित्रकार राजा रविवर्मा, आधुनिक संगीतशास्त्राचे प्रवर्तक भातखण्डे गुरूजी तसेच ललितकलेचा आश्रयदाता मणिपूरचा राजा भाग्यचंद्र आदी विख्यात कलावंत सदैव स्मरणीय आहेत. 

रविवर्मा भातखण्डे भाग्यश्चंद्रः स भूपतिः । कलावंतश्च विख्याताः स्मरणिया नितंतरम् ॥ २१ ॥ 

झाले किती खचित होतीलही अनेक । राष्ट्रा समर्थ करण्या झटले कृतार्थ ॥ 
त्यांच्या स्मृतीस स्मर तू सदा मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

दण्डकारण्यात वैदिक संस्कृतीची ध्वजा फडकवल्यावर सप्तसिंधूंपलीकडे जावा सुमात्रादी द्विपांवर सम्यक संचार करणारे महर्षी अगस्ती, प्रागैतिहासिक काळात कंबोडिया सारख्या प्रदेशावर अधिकार करून तेथील सर्वतोमुखी विकास केल्यामुळे त्या देशास स्वतःचे नाव देणारा राजा कंबू, आग्नेय आशियात फुनान साम्राज्य स्थापणारा भारतीय कौण्डिण्य, मलाया द्विपापर्यंत साम्राज्यविस्तार करणारा चौल राजेंद्र, पराक्रमाने कलिंगविजय मिळवणारा अन् त्यातील नरसंहाराने व्यथित होऊन बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट चण्डाशोक, अधोगतीस पोहोचलेल्या अखेरच्या मौर्य नृपतीस बाजूस सारून यवनांना पळवणारा सेनापती पुष्यमित्र शुंग व यवनराज दिमित्राचे आक्रमण परतवण्याकरता मगधराजाशी शत्रुता विसरून संधी करणारा चेदिराज खारवेल यांच्या स्मरणाने आमची संघशक्ती जागृत होते. 

अगस्त्यः कंबुकौण्डिन्यौ राजेंद्रश्चोलवंशजः । अशोकः पुष्यमित्रश्च खारवेलः सुनीतिमान् ॥ २२ ॥ 

कौटिलीय अर्थशास्त्राचा रचयिता आर्य चाणक्य, हिंदुकुशपर्वतापर्यंत प्रशासन करणारा सम्राट चंद्रगुप्त, अवंतीच्या स्वतंत्रतेसाठी शकांचा पराभव करणारा शककर्ता सम्राट विक्रमादित्य, पैठणला नवी राजधानी वसवणारा शककर्ता शातवाहन राजा शालिवाहन, आर्यावर्तात सुवर्णयुग आणणारा दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त, हूणांच्या वर्चस्वापासून मुक्त असे एकछत्री साम्राज्य स्थापून कन्नौजला त्याची राजधानी करणारा राजा हर्षवर्धन, ब्रह्मदेशावर सत्ता गाजवणारा कलिंगराज शैलेंद्र तसेच अरबस्थानापर्यंत पाठलाग करून अरबांना परास्त करणारा चितौडाधिपती बाप्पा रावळ यांचे स्मरण आम्हाला "परं वैभवं नेतुं एतद् स्वराष्ट्रम्" ह्या आमच्या निर्धाराची आठवण करून देते. 

चाणक्यश्चंद्रगुप्तौच विक्रमः शालिवाहनः । समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेंद्रो बप्परावळः ॥ २३ ॥ 

मामापेक्षा देश मोठा म्हणून मुगल सेनेला फितुर झालेल्या मामाचा शिरच्छेद करणारा वीर अहोम सेनापती लाचित बडफुकन, कुशल प्रशासक राजा भास्करवर्मा, महाक्रुर हूण राजा मिहिरकुल याचा पराभव करणारा मंदसौरनरेश यशोधर्मा, विजयनगरचा प्रसिद्ध शास्ता कृष्णदेवराय व आक्रमण हाच संरक्षणाचा राजमार्ग मानून "तुर्क, मुस्लिमादी" आक्रमकांचा त्यांचे घरापर्यंत जाऊन पाठलाग करून त्यांना परास्त करणारा ललितादित्य मुक्तापीड आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देतात. 

लाचिद भास्करवर्माच यशोधर्माच हूणजित । श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥ २४ ॥ 

महान संघटक मुसुनुरी नायक (प्रोलय व कप्पय), मेवाड नरेश महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज तसेच काशी विश्वनाथ व हरमिंदर मंदिरावर सुवर्णकलश चढवणारा महाराजा रणजीतसिंह यांचे विक्रम विश्वविख्यात आहेत. त्यांचे स्मरण आमच्या विजिगिषू वृत्तीत भर घालते. 

मुसुनुरिनायकौ तौ प्रतापः शिवभूपती: । रणजित्सिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमा: ॥ २५ ॥ 

सांख्यसूत्रांचे रचयिता कपिल मुनी, वैशेषिक सूत्र प्रणेता महर्षी कणाद, प्रख्यात शल्यविशारद सुश्रुत, कायाचिकित्सेवर "चरकसंहिता" लिहीणारे चरकऋषी, गुरूत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य तसेच बृहत्संहितेचे रचयिता वराहमिहिर आमच्यातील वैज्ञानिक प्रेरणांना दृढमूल करतात. 

वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा । चरको भास्कराचर्यो वराह्मिहिरः सुधीः ॥ २६ ॥ 

रसायनशास्त्राच्या व आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भावास राज्य सोपवणारा नागार्जुन, प्राचीन विमानविद्येचे प्रणेते भरद्वाज ऋषी, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आर्यभट्ट, वनस्पतींना जीव असतो असा शोध लावणारे जगदीशचंद्र बोस, प्रकाशावरील "रामनप्रभाव" शोधून काढणारे चंद्रशेखर वेंकटरमण व श्रेष्ठ गणितज्ञ रामानुजम् आमच्या संपन्न वैज्ञानिक परंपरेची आम्हाला आठवण देतात. 

नागार्जुनो भरद्वाजः आर्यभट्टो बसुर्बुधः । ध्येयो वेंकटरामश्च विज्ञा रामानुजादयः ॥ २७ ॥ 

स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद, गीतांजलीकार रविंद्रनाथ ठाकूर, ब्राह्मोसमाजसंस्थापक राजा राममोहन राय, स्वामी रामतीर्थ, योगी अरविंद तसेच स्वामी विवेकानंद यांचा सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभलेला आहे. 

रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः । रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशाः ॥ २८ ॥ 

थोर समाजसुधारक दादाभाई नौरोजी, दीनदुःखितांचे कैवारी गोपबंधू दास, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" असा उद्घोष करणारे लोकमान्य टिळक, अहिंसेचे पूजक महात्मा गांधी, रमण महर्षी, पंडित मदन मोहन मालवीय तसेच सुब्रह्मण्यम् भारती अशा थोर पुरूषांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.

दादाभाई गोपबंधुः तिलको गांधिरादृताः । रमणो मालवीयश्च श्रीसुब्रह्मण्यमभारती ॥ २९ ॥ 

सुभाषचंद्र बोस, भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक प्रणवानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भिल्ल सेवा मंडळाचे संस्थापक ठक्कर बाप्पा, घटनाकार आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रखर पुरस्कर्ते महात्मा फुले तसेच हिंदू संघटक नारायण गुरू अशांचे स्मरण आम्हाला प्रेरणा देते. 

सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः । ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरूः ॥ ३० ॥ 

संघनिर्माता डॉ. हेडगेवार व संघविस्तारक गोळवलकर गुरूजी यांचे स्मरण सदैव चैतन्यदायी भासते.

संघशक्तिप्रणेतारौ केशवोमाधवस्तथा । स्मरणीया सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥ ३१ ॥ 

या भारतवर्षात असे अनेक ईश्वरी आविष्कारास जवळ असणारे महाभाग होऊन गेले ज्यांची नावे वर उल्लेखित नाहीत. असेही अनेक अज्ञात वीर होऊन गेले ज्यांनी समरांगणावर शत्रूचा विध्वंस केला. त्याचप्रमाणे अनेक समाजोद्धारक व उपयुक्त विज्ञानाविष्कारांत निष्णात असे दिग्गज होऊन गेलेत. पण त्याची नावे ज्ञात नाहीत. अशा सर्व महात्म्यांना आमचे वंदन असो. एकात्मतास्तोत्राची अखेर त्यांच्या स्मरणाविना होऊच शकणार नाही.

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तःरुदयाः । अविज्ञाता वीरा अधिसमरमुध्वस्तरिपवः ॥ 
समाजोधर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणः । नमस्तेभ्यो भूयाद् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ॥ ३२ ॥ 

हे एकात्मतास्तोत्र जो श्रद्धेने म्हणेल तो राष्ट्रभक्त अखंड भारताचेच स्मरण करेल. यात संशय नाही.

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् । स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत् ॥ ३३ ॥ 

॥ भारत माता की जय ॥ 

थोर महात्मे होऊन गेले चरीत्र त्यांचे पाहा जरा । 
आपण त्यांचेसमान व्हावे हाच सापडे बोध खरा ॥

एकात्मता स्तोत्र http://music.cooltoad.com/music/song.php?id=197361 वरून अधोभारित करता येईल. ऐकण्यास छान वाटते. http://www.geetganga.org/ ह्या ठिकाणी संघ संबंधित तसेच इतर देशभक्तीपर गीते थेट ऐकता येतील. तसेच अधोभारित सुद्धा करता येतील.

२०२२१११०

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या 
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ॥ धृ ॥

वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी 
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी 
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ॥ १ ॥ 

खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती 
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती 
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ॥ २ ॥ 

तुळजापुरची भवानी माय महान मंगला 
राउळात अधम खान दैत्यासह पोचला ।
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ॥ ३ ॥ 

श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले 
रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले 
देउनी बळी अजास तोशवी भवानीला ॥ ४ ॥ 

सावधान हो शिवा! वैर्याची रात्र ही 
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही 
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ॥ ५ ॥ 

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला 
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या 
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला ॥

कवी सुरेश देशपांडे, धरमपेठ, नागपूर.

खूप वर्षांनी पद्य म्हणण्याचा प्रयत्न केलाय. – माया ज्ञानेश देशपांडे

प्रतापगड, १०-११-१६५९, अफजलखानवध    #शिवप्रतापदिन, १०-११-२०२२.



२०२२१०११

संघ युगाची पहाट

प हाट झाली संघ युगाची विश्वासाने काम करु ।
पू ज्य भाव तो ठेवून चित्ती भारतभूचे स्मरण करु ॥ धृ ॥ 

मो ल देऊनी निज प्राणाचे देशासाठी जगू - मरु
ह सतमुखाने सदैव आपण राष्ट्रासाठी कार्य करु ।
न कोच आम्हा स्वार्थ भावना संघटनेची कास धरु
जी वन सगळे संघासाठी आनंदाने दान करु ॥ १ ॥ 

भा ग्य आमुचे थोरच म्हणुनी संघप्रवाही आलो
ग त जन्माच्या पुण्याईने पावन आम्ही झालो ।
व टवृक्षापरि देऊन छाया सकलांचा आधार ठरु
त मा न आता परिश्रमाची ध्येय आपुले साध्य करु ॥ २ ॥ 

भारत माता की जय

प्रत्येक ओळीची अद्याक्षरे घेल्यास प.पू. मोहनजी भागवत असे वाक्य तयार होते.

सर्वं स्वयंसेवकाना ही कविता सादर अर्पण.

     .....  उमाकांत देशमुख, पुणे.

     .....  दि. ७ ऑक्टोंबर २०२२, शुक्रवार.

२०२२०८०७

आर्त भक्तिने स्मरता केशव

स्फुर्तिगान-३७ 

आर्त भक्तिने स्मरता केशव, कोटि जीवन तुझ्यात विरतील ॥धृ॥

शांतहृदय तू विशाल सागर, चारित्र्याचा शुभ्र हिमाचल ।
आकाशाची तुझी भव्यता प्रसन्न जीवन गंगेचे जल ॥१॥ 

उदरी लाव्हा रसरसलेला, वरून पण ही क्षमाशीलता ।
त्यासम जीवन तुझे केशवा, उरात ज्वाला वरून शीतला ॥२॥ 

धुतले अमुचे मलीन जीवन, धर्मबिंदुचे शिंपुन तू जल ।
राष्ट्रभक्तिचे बीज पेरुनी, तूच फुलवली धरती शामल ॥३॥ 

कृतीचा धरला तू गोवर्धन, लावून त्याला कोटी बाहुबल ।
मातृभक्तिच्या सेतुवरुनी स्वर्ग जिंकण्या वीर धावतील ॥४॥ 

मातृमंदिरी धुंद होउनी लावुनि भाली मातृचरणधुल ।
कोटि मुखांनी तूच गर्जला, जय मृत्युंजय माता मंगल ॥५॥ 

भवितव्याच्या सागरातला स्तंभदीप तू निर्भय निश्चल ।
करोत कितीही आज उपेक्षा अखेर सारे तुलाच स्मरतील ॥६॥ 

तुझ्या स्मृतीने जीव तगमगे नेत्रांतुन जल निर्मळ खळते ।
कणाकणाने विरून व्हावे श्रद्धेया मी अंश तुझ्यातील ॥७॥

स्वयंसेवकों का यही एक सपना

स्वयंसेवकों का यही एक सपना ।
बने कार्यकर्ता बढे देश अपना ॥ धृ ॥ 

कोई श्यामवर्णी कोई गौर वर्णी
कोई शांतभावी कोई क्रोधकर्णी ।
सभी मित्र बनकर करे काम मिलकर
कोई हो नवागत तो कोई पुराना ॥ १ ॥

न पूर्वाग्रही हो न हो आत्मभावी
हृदय मन खुला हो विवेकी स्वभावी ।
विचारों में स्थिरता वचन में मधुरता
परायों व अपनों की निंदा से बचना ॥ २ ॥

उमंगी रहे हम उमंगी हो साथी
गति भी रहे आपसी मेल खाती ।
अकेले ना हों हम यही ध्यान हरदम
कदम से कदम को मिलाकर ही चलना ॥ ३ ॥

हो चिंतन हमारा सदा दूरगामी
मगर कार्यशैली हो एक एक कदमी ।
सभी काम भारी हो परिणामकारी
सफलता मिलेगी यही भाव भरना ॥ ४ ॥

वाचन मनन और अनुभव कथन से
रखे अद्यतन ज्ञान बौद्धिक यतन से ।
सदा स्वस्थ हों और रहें व्यस्त भी हम
समयदान क्षमता बढाते ही रहना ॥ ५ ॥

https://www.youtube.com/watch?v=noWkmVPwcBI&t=21s

२०२२०७०२

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के शक्तिशाली और विस्तारित होने का रहस्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के शक्तिशाली और विस्तारित होने का रहस्य – प्रकाश नायक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सारी दुनिया के चिंतन का केन्द्रीभूत विषय बन गया है। संघ जहां धर्म, अध्यात्म, विश्व कल्याण और मानवीय मूल्यों की रक्षा करनेवालों के लिए शक्ति स्थल है, वहीं वह हिन्दू या भारत विरोधी शक्तियों के लिए चिंता और भय कम्पित करनेवाला संगठन भी है। विश्व के सबसे बड़े संगठन के रूप में ख्यात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), सन १९२५ में विजयादशमी के दिन नागपुर में स्थापन हुआ। पराधीन भारत में जन्में इस संगठन के विस्तार की राह आसान नहीं थी। संघ को रोकने के लिए विरोधी पग-पग पर कांटें बोते रहे पर वे संघ के संगठन शक्ति को रोक नहीं पाए।

आखिर, संघ के मूल में ऐसी कौन सी शक्ति छिपी है जिसने उसे इतना बड़ा कर दिया कि आज वह दुनिया के बुद्धिजीवियों के ध्यानाकर्षण का केन्द्र बन गया है। यही प्रश्न संघ के प्रशंसकों, विरोधियों और शोधकर्ताओं के मन में उठता है। इसलिए इन प्रश्नों के उत्तर यदि चाहिए तो सबको संघ संस्थापक एवं आद्य सरसंघचालक डॉ. केशव बलिराम हेडगेवार के विचारों को उचित परिप्रेक्ष्य में समझना होगा, क्योंकि उन्होंने ही संघ की स्थापना की और उसका लक्ष्य निर्धारित किया। वास्तव में डॉ.हेडगेवार के संदेशों में ही छिपा है आरएसएस के शक्तिशाली और विस्तारित होने का रहस्य।  

स्वयं के उद्धार के लिए संघ की स्थापना

डॉ. हेडगेवार ने १३ अक्टूबर, १९३७ को विजयादशमी के दिन अपने प्रबोधन में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना के उद्देश्य को निरुपित करते हुए कहा था कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना केवल अपने स्वयं के उद्धार के लिए ही किया गया है। संघ का कोई दूसरा-तीसरा उद्देश्य न होकर केवल स्वयं का उद्धार करना, यही उसकी इच्छा है। परन्तु स्वयं का उद्धार कैसे होगा, पहले हमें इसपर विचार करना होगा। स्वयं का उद्धार करने के लिए जीवित रहना पड़ता है, जो समाज जीवित रहेगा वही समाज स्वयं का और अन्यों का उद्धार कर सकता है और संघ की स्थापना इसी के लिए हुआ है। हिन्दू समाज जीवित रहे अथवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टइस तत्व के अनुसार जीवित रहने योग्य रहे इस उद्देश्य से ही संघ का जन्म हुआ है।

डॉ. हेडगेवार के इस आहवान को स्वीकार कर अनेकों ने संघ कार्य के लिए अपने जीवन को समर्पित किया, जिनमें श्रीगुरूजी गोलवलकर, बालासाहब देवरस, एकनाथ रानडे, भाउराव देवरस, यादवराव जोशी, दादा परमार्थ, बाबासाहेब आपटे तथा माधवराव मुले आदि महानुभाव प्रमुख थे।

आक्रान्ताओं को दोष न दें

डॉ. हेडगेवार ने कहा, “हिन्दू राष्ट्र पर अतीत में अनेक आक्रमण हुए, वर्तमान में भी हो रहे हैं और कदाचित भविष्य में भी ऐसा होता रहेगा, यह संघ जानता है। संघ को यह भी मालूम है कि दूसरे समाज पर जो समाज आक्रमण करता है, दूर से देखनेवाले लोग उन्हें दोष देते हैं और जिनपर आक्रमण होता है उसके प्रति सहानुभूति रखते हैं। पर ये उनकी दृष्टि से ठीक है। अब जिनपर आक्रमण होता है उस समाज ने आक्रान्ताओं को दोष देते बैठे रहने के बजाय, ये आक्रमण क्यों होते हैं, इसके कारणों को खोजकर उसे दूर करना चाहिए। यह दृष्टि सामने रखकर अपने हिन्दू समाज की ओर देखें तो ये अत्याचार व आक्रमण होने का मुख्य कारण हमारी दुर्बलता व नासमझी ही है। आज हिन्दू समाज इतना नासमझ हो गया है कि कोई भी आता है और अपने सनकी मिजाज से हिन्दू समाज पर मनमानी अत्याचार करता है। पर अभी भी हमें इसकी कोई चिंता नहीं होती तथा अपने असंगठित और बिखरेपन को दूर करने के लिए जैसा होना चाहिए वैसा प्रयास होता दिखाई नहीं देता, संघ को यह अच्छा नहीं लगता। हमें गुस्सा आता है, हिन्दुओं के इस तिरस्कृत मनोवृत्ति का, न कि हिन्दुओं का। क्योंकि वे अपने ही हैं और उनके उद्धार के लिए ही हमारा जन्म हुआ है। पर यह तिरस्करणीय मनोवृत्ति स्वयं की रक्षा न करने की वृत्तिमौजूद होने की वजह से हिन्दू समाज पर होनेवाले आक्रमण समाप्त होना संभव नहीं। संघ को हिन्दुओं की इस कमजोरी को निकाल बाहर कर इस पाप को धोकर निकलना है और इसलिए ही इस आसेतु हिमालय हिन्दुस्थान के प्रत्येक कोने में संघ की शाखाओं का मजबूत संजाल फैलाकर सम्पूर्ण हिन्दू समाज को संगठित, प्रबल और स्वरक्षणक्षम बनाना, यही यही संघ की इच्छा है।

प्रत्यक्ष काम करनेवाले लोग चाहिए

२९ अगस्त, १९३९ को लाहौर में संपन्न हुए अधिकारी शिक्षण वर्ग में डॉ. हेडगेवार ने अपने भाषण में संघ को अपेक्षित स्वयंसेवकों की योग्यता और गुण संवर्धन को लेकर महत्वपूर्ण बातें कही थी।

उन्होंने कहा, “संघ को प्रत्यक्ष काम करनेवाले लोग चाहिए। संघ के पास ऐसी कोई सत्ता नहीं कि किसी से काम करवा सके, न धन है जिससे तनखा दे सके। संघ का कार्य नैतिक बल से चलता है। वह किसी पर जबरदस्ती नहीं कर सकता। इसलिए नैतिक बल से ही लोगों को खींच कर आप संघ में ला सकते हैं। आपकी संख्या इतनी हो जानी चाहिए कि आप लोगों को आकर्षित कर सकें, उनके दिलों को मोह लें, अपने चरित्र के मोह से। आपके सम्बन्ध में लोगों के दिलों में प्रेम होना चाहिए। इस दृष्टि से आप आकर्षण का केन्द्र बनने की कोशिश करें। लोगों के अन्दर जो तकरार होती है, हमारे में न हो। आपको लोग आदर्श समझे। वह कहे कि नौजवान वह, कि जो संघ के स्वयंसेवक जैसा हो। उनके मन में ऐसा विचार हो कि मेरा छोटा भाई भी संघ में जाकर ऐसा बनें। संघ के स्वयंसेवक पर इस नाते सभी जवाबदारी है।

उन्होंने कहा, “आपके मन में विचार हो कि पढ़ना भी संघ का कार्य है, क्योंकि संघकार्य के लिए पढ़ना है। जितना ज्यादा पढ़ जाऊंगा उतना ज्यादा कार्य कर सकूंगा। आपका व्यवहार आदर्श हो। दूसरे लोगों को भी ऐसा बनाने की आपकी जिम्मेदारी है। संघ का काम करने के लिए आपको योग्य होना चाहिए, शरीर से, दिमाग से, सब ओर से। ताकतवर आदमी कमजोर से ज्यादा कार्य कर सकता है।   

प्रेम से प्रेम की वृद्धि

डॉ. हेडगेवार स्वयंसेवकों को प्रेम का महत्त्व बताते हैं। वे कहते हैं, लोगों को ऐसा प्रतीत होना चाहिए कि यह हमारे पास आए, बैठे, बातचीत करें। ऐसा नहीं कि आपको देखकर लोग दौड़े, छिपते फिरें। लोगों को आप प्रेम से देखें, तो लोग भी आपको प्रेम से देखेंगे। प्रेम से प्रेम की वृद्धि होती है।

उन्होंने कहा कि, मेरा सन्देश यही है कि आप ऐसे प्रेम और आदर्श की मूर्ति बनें कि लोग आपकी ओर खींचे आए। आपके हाथ के साथ किसी का हाथ भी लगे, आपके साथ कोई बात भी कर ले फिर वह आपको न भूल सके। ऐसी आपकी वाणी में मिठास हो। किसी पुरुष के आप सदगुण ग्रहण करें, साथ ही अपने प्रभाव से उसके दुर्गुण दूर करें।

डॉ. हेडगेवार स्वयंसेवकों को आत्मपरीक्षण की सलाह देते हुए कहते हैं कि, “आप कभी भी अपने को सर्वगुणसम्पन्न मत समझो, नहीं तो आपके सब गुण निरर्थक हो जाएंगे। आप रात को सोते समय विचार करें कि दिनभर मैंने क्या किया, क्या गलती की है, आगे क्या करना है। ऐसा सोचने से तथा करने से आप समाज के नेता बनेंगे और जाति का काम बहुत बढ़ा सकेंगे। 

डॉ. हेडगेवार राष्ट्र से जितना प्रेम करते थे, उतना ही प्रेम वे समाज व स्वयंसेवकों से करते थे। उनमें मनुष्य को देशकार्य के लिए समर्पित होने की प्रेरणा देने का अदभुत कौशल था। वे स्वयंसेवकों को मातृवत स्नेह करते थे, सलाह देते थे, प्रेरित करते थे। उनकी वाणी, चरित्र और कार्य में इतना सामर्थ्य था कि उन्होंने जिसके कन्धों पर हाथ रखा वे उनके साथ चलने लगे। उन्होंने जिसे पुकारा वे उनके हो गए। उन्होंने जिनको संघ के माध्यम से राष्ट्रकार्य में लगाया, उन सभी ने अपने ही तरह सैंकड़ों को तैयार किया, सैंकड़ों ने हजारों को तैयार किया, हजारों ने लाखों स्वयंसेवकों का जीवन गढ़ा। अब स्वयंसेवकों की तादात करोड़ों में हो गई है और ये स्वयंसेवक देश और दुनिया में समाज के उत्थान के लिए सेवाकार्यों के माध्यम से अपना कर्तव्य कर रहे हैं।

आज संघ के ही एक स्वयंसेवक श्री नरेन्द्र मोदी भारत के प्रधानमंत्री हैं। उनके ही प्रस्ताव को मानकर हाल ही में २१ जून, को दुनियाभर में अंतर्राष्ट्रीय योग दिवसमनाया गया। यह संघ के स्वयंसेवक के प्रस्ताव की वैश्विक मान्यता का अनुपम उदाहरण है।


२०२२०७०१

प्रमाण

 प्रमाण

कृष्णाजी नारायण आठल्ये

अतीकोपता कार्य जाते लयाला
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे  ॥ १ ॥ 

अती लोभ आणी जना नित्य लाज
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ २ ॥ 

अती मोह हा दु:ख शोकास मूळ
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ३ ॥

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ४ ॥ 

अती दान तेही प्रपंचात छिद्र
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ५ ॥

अती भोजने रोग येतो घराला
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ६ ॥

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ७ ॥

अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ८ ॥

अती द्रव्यही जोडते पापरास
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ९ ॥

अती भाषणे वीटती बुद्धिवंत
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १० ॥

अती वाद घेता दुरावेल सत्य
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे जर
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ११ ॥ 

अती औषधे वाढवितात रोग
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १२ ॥

अती दाट वस्तीत नाना उपाधी
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १३ ॥

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १४ ॥ 

अती भूषणे मार्ग तो संकटाचा
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १५ ॥ 

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १६ ॥ 

अती भांडणे नाश तो यादवांचा
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १७ ॥

अती गोड खाणे नसे रोज इष्ट
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १८ ॥ 

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १९ ॥ 

सदा पद्य घोकोनियां शीण येतो
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ २० ॥

रामदासस्वामींप्रमाणेच या कवितेत "भुजंगप्रयात"
वृत्ताचा  देदिप्यमान वापर केलेला दिसून येईल.
यातील तत्त्वसार सदा संजीवित आढळून येईल.

२०२२०६२६

हिन्दुराष्ट्र संघटकं सुजन वंदनीयम्‌

हिन्दुराष्ट्र संघटकं सुजन वंदनीयम्‌ ।
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥धृ॥ 

राष्ट्रमिदं हिन्दुनां खलु सनातनम्‌
विघटनया जातं चिर दास्य भाजनम्‌ ।
दुःखदैन्य पीडितमिति पीडित हृदयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥१॥ 

भगवध्वज एवराष्ट्र गुरुरयं महान्‌
देशोयं खलु देवो जगति महियान ।
उपदिशन्तमिति सारं दृढमाचरणीयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥२॥ 

वीरव्रतमेव परं धर्म निधानम्‌
सुशीलमेव लोकेस्मिन परम निधानम्‌ ।
बोधयन्त मिति तत्त्वम्‌ सततस्मरणीयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥३॥ 

नेतुम्‌ निजराष्ट्रमिदं परमवैभवम्‌
नयत विलयमंतर्गत सकल भेदभावम्‌ ।
संघमंत्रमिति जपन्त मेकमेशनीयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥४॥