दुंदुभी
निनादल्या,
नौबती
कडाडल्या,
दशदिशा
थरारल्या ।
केसरी
गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ॥ धृ ॥
वाकुनी
अदिलशहास कुर्निसात देवुनी ।
प्रलयकाल
तो प्रचंड खान निघे तेथुनी ।
हादरली
धरणि व्योम शेषही शहारला ॥ १ ॥
खान
चालला पुढे,
अफाट
सैन्य मागुती ।
उंट, हत्ती, पालख्याही रांग
लांब लांब ती ।
टोळधाड
ही निघे स्वतंत्रता गिळायला ॥ २ ॥
तुळजापुरची
भवानी माय महान मंगला ।
राउळात
अधम खान दैत्यासह पोचला ।
मूर्ती
भंगली मनात चित्रगुप्त हासला ॥ ३ ॥
श्रवणी
तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले ।
रक्त
तापले मनात खडग सिध्द जाहले ।
देउनी
बळी अजास तोशवी भवानीला ॥ ४ ॥
सावधान
हो शिवा! वैर्याची रात्र ही ।
काळ
येतसे समीप,
साध
तूच वेळ ही ।
मर्दण्यास
कालियास कृष्ण सज्ज जाहला ॥ ५ ॥
केसरी
गुहेसमीप मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला ।
दुंदुभी
निनादल्या,
नौबती
कडाडल्या,
दशदिशा
थरारल्या ।
केसरी
गुहेसमीप मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला ॥
कवी सुरेश देशपांडे, धरमपेठ, नागपूर.
खूप वर्षांनी पद्य म्हणण्याचा प्रयत्न केलाय. – माया ज्ञानेश देशपांडे
प्रतापगड,
१०-११-१६५९, अफजलखानवध #शिवप्रतापदिन,
१०-११-२०२२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा