प
हाट झाली संघ युगाची विश्वासाने काम करु ।
पू ज्य
भाव तो ठेवून चित्ती भारतभूचे स्मरण करु ॥ धृ ॥
मो ल
देऊनी निज प्राणाचे देशासाठी जगू - मरु
ह
सतमुखाने सदैव आपण राष्ट्रासाठी कार्य करु ।
न
कोच आम्हा स्वार्थ भावना संघटनेची कास धरु
जी
वन सगळे संघासाठी आनंदाने दान करु ॥ १ ॥
भा
ग्य आमुचे थोरच म्हणुनी संघप्रवाही आलो
ग त
जन्माच्या पुण्याईने पावन आम्ही झालो ।
व
टवृक्षापरि देऊन छाया सकलांचा आधार ठरु
त
मा न आता परिश्रमाची ध्येय आपुले साध्य करु ॥ २ ॥
भारत माता की जय
प्रत्येक ओळीची अद्याक्षरे घेल्यास प.पू. मोहनजी भागवत असे वाक्य तयार होते.
सर्वं स्वयंसेवकाना ही कविता सादर अर्पण.
.....
उमाकांत
देशमुख,
पुणे.
.....
दि. ७
ऑक्टोंबर २०२२,
शुक्रवार.