२०२२१०११

संघ युगाची पहाट

प हाट झाली संघ युगाची विश्वासाने काम करु ।
पू ज्य भाव तो ठेवून चित्ती भारतभूचे स्मरण करु ॥ धृ ॥ 

मो ल देऊनी निज प्राणाचे देशासाठी जगू - मरु
ह सतमुखाने सदैव आपण राष्ट्रासाठी कार्य करु ।
न कोच आम्हा स्वार्थ भावना संघटनेची कास धरु
जी वन सगळे संघासाठी आनंदाने दान करु ॥ १ ॥ 

भा ग्य आमुचे थोरच म्हणुनी संघप्रवाही आलो
ग त जन्माच्या पुण्याईने पावन आम्ही झालो ।
व टवृक्षापरि देऊन छाया सकलांचा आधार ठरु
त मा न आता परिश्रमाची ध्येय आपुले साध्य करु ॥ २ ॥ 

भारत माता की जय

प्रत्येक ओळीची अद्याक्षरे घेल्यास प.पू. मोहनजी भागवत असे वाक्य तयार होते.

सर्वं स्वयंसेवकाना ही कविता सादर अर्पण.

     .....  उमाकांत देशमुख, पुणे.

     .....  दि. ७ ऑक्टोंबर २०२२, शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा