उजाळिले तू तममय जीवन संघ युगाचा शालिवाहन ॥धृ॥
करून
योग तव ज्वलंत प्रेरक मातीतूनही उठले सैनिक
वाण सतीचे घेऊन दाहक प्रकाश फुलवित अंधारातून ॥१॥
सामर्थ्यातून तत्वाचा जय धर्मरक्षण्या शक्तिसंचय
राष्ट्र आपुले हे मृत्युंजय तूच गायिले निज हवनातून ॥२॥
हिंदुत्वाचा
विशाल सागर विभिन्नतेच्या लाटा वरवर
परी अंतरी एकच सुस्वर जागविले हे सत्य सनातन ॥३॥
तव
शब्दांचे अमृत सिंचन देशाचे या फुलले यौवन
पुरुषार्थाचे जगण्या जीवन अगणित सेवक झिजले कणकण ॥४॥
महिमा
आता संघ युगाचा विशालतेचा, उदात्ततेचा
जीवन इथले बहरविण्याचा तुझी तपस्या मंगल पावन ॥५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा