तन-मन-धन
अर्पून दक्षिणा ।
ध्वजराजा
तव आज अर्चना ॥धृ॥
कोसळत्या
आभाळाखाली
परिस्थितीचे
प्रहार झेली ।
धीट
उभा हा संहत हिंदू
भाग्य
रवीच्या दिव्य दर्शना ॥१॥
देहदंड
का प्राणा बघतिल
विपदा
कधि ध्येयास दडपतिल ।
छळनिंदांच्या
झळा पचवुनी
तेजाळत
ही तपःसाधना ॥२॥
या
भूमीच्या रजःकणातुन
वरती
तेजोमय गगनातुन ।
उठे
भक्तिची ऋचा सुमंगल
तशीच
अन् भयद ती गर्जना ॥३॥
वैभवशाली
राष्ट्रोत्थापन
याच
व्रताचे धरिले कंकण ।
अखंड
राहो हीच साधना
एवढीच
तव पदी प्रार्थना ॥४॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा