कोटि
कोटि कंठातुन होतो ।
मातेचा
जयकार ।
घडावा
संघाचा संस्कार ॥धृ॥
भरतभूमिचे
वीरपुत्र अम्ही
ध्यास
एक हा सदा जीवनी ।
वैभवि
नेण्या मातृभूमिला
संघ
हाच आधार ॥१॥
प्रताप
राणा शिवप्रभुबाजी
नररत्ने
जन्मली इथे जी ।
त्या
विरांचे आम्ही वंशज
स्वप्न
करू साकार ॥२॥
तन
मन धन हे आज समर्पुन
पूर्ण
करू या हे जनजीवन ।
कीर्ति
शिखरि हा चढवू भारत
हाच
असे निर्धार ॥३॥
नित्य
पूजनी भगवा ध्वज हा
स्मरा
सांगतो पराक्रमाला ।
त्याग
शिकवुनी स्फुरणहि देतो
हा
गुरुचा अधिकार ॥४॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा