या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल । हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ॥धृ॥
श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले । भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले ॥
श्रेष्ठत्व जगाने मान्य तयांचे केले । ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील
॥१॥
जातीपंथ भाषा, नको वृथा अभिमान । भेदांच्या भिंती पडोत सर्व गळोन ॥
निद्रेतुनी जागा व्हावा हिंदुस्थान । हे तेज जगाला निस्संशय दिपवील ॥२॥
आसाम असो पंजाब असो बंगाल । तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामीळ ॥
हा अखंड भारत परि आसेतुहिमाचल । विविधतेतुनी एकता इथे प्रकटेल ॥३॥
हा समाज अपुला ध्येयापासुनी ढळला । हिंदूच हिंदुच्या विरोधात उठलेला ॥
परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला । कष्टाने अमुच्या देशभक्त होईल ॥४॥
राष्ट्राचा कराया घात कुणीधजतील । परकीय शक्तीला साथ कुणी देईल ॥
बलदंड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देईल । हा संघशक्तीचा साक्षात्कार घडेल ॥५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा